मुंबईत धरणे आंदोलनाची तयारी
मानोरा – शेंदुरजना आढावा येथील नाईक चौक येथे
माजी मंत्री बच्चु कडु यांच्या शेतकरी–शेतमजूर हक्क सभेला
मोठा प्रतिसाद मिळाला. सभा ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती,
Related News
ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठविण्यावर भर देण्यात आला.
सभा वेळी कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, दामुअण्णा इंगोले, पंकजपाल महाराज,
रमेश महाराज, मनोहर राठोड यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बच्चु कडु यांनी सांगितले की, ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची,
ध्वजाची किंवा धर्माची नाही, ही लढाई माझ्या शेतकरी वडिलांची आहे.
त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे दिलेल्या आश्वासनाची आठवण
करून देत ७/१२ कर्ज माफीसाठी ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली.
बच्चु कडु म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी केल्यास
शेतकरी आत्महत्येचा संख्यात्मक घसरण होईल
आणि शेतकऱ्यांना जीवनमान सुधारण्याची संधी मिळेल.
शेतकऱ्यांसाठी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत धरणे आंदोलन
आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. सभा यशस्वी होण्यासाठी तालुका प्रमुख
शाम पवार, चेतन पवार, रवि राऊत, प्रशांत धोत्रे, सर्वेश खाडे,
करण वाघमारे, कपिल राठोड, अविशान डोंगरे, युवराज राठोड,
संजय राठोड, राहुल भगत, अजय पवार, लहु राठोड,
रोशन चव्हाण, रुषि चौधरी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.