DPL 2025 : नितीश राणाचा राडा! शतकानंतर मैदानात हाणामारीचा थरार, व्हिडिओ व्हायरल

नितीश राणाचा राडा! शतकानंतर मैदानात चकमक

दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात

वेस्ट दिल्ली लायन्सचा कॅप्टन नितीश राणा याने

धडाकेबाज बॅटिंग करत केवळ 42 चेंडूत शतक ठोकलं.

त्याने तब्बल 15 षटकारांची आतषबाजी केली.

मात्र, त्याच्या शतकापेक्षा जास्त चर्चेत आली

ती मैदानातील त्याची आक्रमक वागणूक आणि झालेला राडा.

साऊथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्धच्या सामन्यात राणाने गोलंदाजांची धुलाई केली.

विशेषत: स्पिनर दिग्वेश राठीच्या एका ओव्हरमध्ये

तीन षटकार ठोकल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

त्याचं भांडण मारहाणीपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात साऊथ

दिल्ली सुपरस्टार्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत

5 गडी गमावून 201 धावा केल्या.

प्रत्युत्तरात वेस्ट दिल्ली लायन्सने फक्त 17 चेंडू राखून सामना जिंकला.

राणाने नाबाद 134 धावा (55 चेंडूत 8 चौकार, 15 षटकार) ठोकल्या.

त्याला क्रिस यादव (31) आणि मयंक गोसाई (15*) यांनी साथ दिली.

या सामन्यामुळे वेस्ट दिल्ली लायन्स क्वालिफायर-2 मध्ये दाखल झाला आहे.

मात्र, नितीश राणाच्या शतकापेक्षा त्याचा

मैदानावरील राडा आणि व्हायरल व्हिडिओच सर्वाधिक चर्चेत आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/maratha-reservation-movement-azhad-maidanchal-agitator-bmc-kadun-warpathy-facility/