दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा जोर; जलभरावामुळे वाहतूक ठप्प

पावसाचा

नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या

जोरदार पावसाने उकाडा पासून दिलासा दिला.

मात्र, जलभरावामुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली.

नोएडा, गाझियाबाद आणि दिल्लीतील मुख्य रस्त्यांवर

पाण्याचे तळे साचल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

डीएनडी फ्लायवे, मथुरा रोड, विकास मार्ग, आयएसबीटी,

गीता कॉलनी व राजाराम कोहली मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.

सरिता विहार मेट्रो स्टेशनपासून बदरपूर फ्लायओव्हरपर्यंत

केवळ ४ किमी अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तासाहून अधिक वेळ

लागल्याची वाहनचालकांची तक्रार आहे.

तसेच पटपडगंज रोड व संजय तलाव परिसरात ही परिस्थिती गंभीर होती.

यात्रींच्या अडचणी लक्षात घेऊन दिल्ली वाहतूक

पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आह.

पावसामुळे वाहनांची गती मंदावली असून, नागरिक सोशल मीडियावर

ट्रॅफिक जामचे फोटो-व्हिडिओ शेअर करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस  पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

नोएडा व गाझियाबादमध्ये जोरदार पावसाचा इशारा,

तर दक्षिण-पूर्व, मध्य, शाहदरा आणि पूर्व दिल्लीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/15-toe-dane-35-lakhmancha-spending-tarihi-hundyachaya-chhala-kantun-pregnant-software-injiniacha-ayushyala-purvanaviram/