मुंबई – आज सकाळपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
निघालेल्या मोर्चामुळे मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली.
आझाद मैदान परिसरात हजारो आंदोलक
जमा झाल्याने आसपासच्या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण निर्माण झाला.
दादर, सीएसएमटी, चर्चगेट, क्रॉस मैदान,
मरीन लाइन्स परिसरात सकाळपासूनच वाहनांची लांबलचक रांग लागली होती.
काही रस्ते पूर्णपणे ठप्प झाले तर पर्यायी मार्गांवरही
वाहनचालकांना मोठा फेरा मारावा लागला.
कामावर जाणारे नोकरदार वर्ग, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी,
तसेच आपत्कालीन सेवांचा वापर करणाऱ्या
नागरिकांना विशेषतः मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता.
आलेल्या सर्व गाड्या थेट पार्किंगमध्ये लावण्याचे आदेश दिले होते.
आंदोलकांनीही रस्त्यांवर गाड्या न ठेवता प्रशासनाला
सहकार्य केले तरी उपस्थितांची संख्या जास्त असल्याने गर्दी ओसंडून वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबईकरांची दैनंदिन कामे थांबली असून लोकल स्थानकांच्या
बाहेर व बस स्थानकांवरही मोठी रांग दिसून आली.
मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईबाहेरून आलेल्या वाहनांमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली.
मात्र सामान्य नागरिकांना मात्र दिवसभर प्रचंड त्रास सहन करावा लागला.