विचित्र खून! आधी मैत्रिणीची हत्या… मग तिचे कपडे, विग घालून काय केले ते ऐकून थरकाप उडेल

खूनानंतरचे थरार! गर्लफ्रेंडचे कपडे घालून फिरला खुनी…

अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पैशांवरून झालेल्या वादातून सुरु झालेलं भांडण थेट खुनापर्यंत पोहोचलं.

पण या खुन्यानंतर आरोपीने जे काही केलं ते ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.

42 वर्षीय अर्नाल्डो सिन्ट्रॉन आपल्या गर्लफ्रेंड गिजेल बोनिला

आणि तिची चुलत बहीण हियोजाइरा बोनिला यांच्यासोबत राहत होता.

घरातील पार्टीदरम्यान पैशांवरून वाद उफाळला

आणि पाहता पाहता अर्नाल्डोने चाकू उचलून हियोजाइरावर वार केले. तिचा मृत्यू झाला.

 पण खरी भीती इथून सुरू झाली…

खून करून अर्नाल्डो थांबला नाही.

त्याने आणि त्याच्या गर्लफ्रेंड गिजेलने मृत हियोजाइराचे कपडे व विग स्वतः घातले.

एवढंच नव्हे, तर हियोजाइराचा बॉयफ्रेंड एल्गा डेव्हिस याला धमकावत कपडेव विग घालायला

आणि रक्त साफ करायला भाग पाडलं.

मृतदेह गॅरेजमधून कारमध्ये टाकून तो Weedon Island Preserve परिसरात पुरण्यात आला.

 सत्य कसं उघडलं?

घटनेने भयभीत झालेल्या डेव्हिसने पोलिसांना सर्व सत्य सांगितलं. त्यानंतर मृतदेह जप्त करण्यात आला.

  • अर्नाल्डो सिन्ट्रॉनला दुसऱ्या श्रेणीचा खून, शस्त्राचा वापर, पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारावर दबाव आणणे

  • या गंभीर गुन्ह्यांत अटक झाली असून तो जामिनाविना तुरुंगात आहे.

  • गिजेल बोनिलावरही पुरावे नष्ट करणे, मृतदेह लपवणे आणि साक्षीदारावर प्रभाव टाकणे

  • या गुन्ह्यांखाली कारवाई झाली आहे. तिचा जामीन तब्बल 200,000 डॉलर (सुमारे 1.5 कोटी रुपये) ठेवण्यात आला आहे.

शेरिफचे विधान

हिल्सबरो काउंटीचे शेरिफ चॅड क्रोनिस्टर यांनी सांगितले –

“हा खून क्रूर आणि भयानक होता. पण त्यानंतर आरोपींनी मृतदेहाशी

आणि पुराव्यांशी जे काही केलं ते अजूनही भीतीदायक आहे.”

सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून न्यायालयीन खटला सुरु आहे.

read also :https://ajinkyabharat.com/maya-himmatrao-dhote-jatik-human-rights-security-federation/