मंगरुळपीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई-सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाईचे कौतुक

तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष राजेश गावंडे यांनी सादर केलेल्या नवनियुक्त तालुका कार्यकारिणीला अखेर हिरवा झेंडा मिळाला आहे. अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष अमानकर म्हणाले – “नवीन पदाधिकारी नक्कीच जोमाने व ताकदीने काम करतील. संघटनेत नवा उत्साह निर्माण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आता पक्षसंघटनेत नव्या उर्जेने कार्यरत होणार असून, स्थानिक स्तरावर काँग्रेसला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मंगरुळपीर  –मंगरुळपीर पोलिसांनी धाडस दाखवत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली.

अवैधपणे तलवार बाळगणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी जेरबंद केले असून, तलवारही जप्त करण्यात आली आहे.

या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस दलाची कर्तव्यदक्षता अधोरेखित झाली असून,

जनतेत कौतुकाची लाट पसरली आहे.

गुप्त बातमीवर कारवाई :

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की,

तालुक्यातील शेलुबाजार परिसरात दोन युवक तलवार घेऊन फिरत आहेत.

त्यानंतर एसडीपीओ व ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली

तात्काळ पथक तयार करून सापळा रचण्यात आला.

तपासणीदरम्यान तलवार जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

गुन्हा नोंदवण्याची तयारी :

सदर प्रकरणी आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला जाणार असून,

वृत्त लिहीपर्यंत प्राथमिक चौकशी सुरू होती. पोलिसांनी कळवले की,

अधिक तपास करून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल.

कौतुकास्पद कारवाई :

सण-उत्सवाच्या काळात ही कारवाई केल्यामुळे ठाणेदार किशोर शेळके

व त्यांचे पथक सर्वत्र चर्चेत असून,

स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक होत आहे.

read also: https://ajinkyabharat.com/patur-taluka-congress-rural-executive-district-president/