वरुणराजाने केले गणेशाचे स्वागत; गणेश बाजारात चिखलाचे साम्राज्य!
अकोला :अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर गणेश बाजार सजला असून,
आज गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी आतुर झाले होते.
यादरम्यान अचानक वरुणराजाचेही आगमन झाले.
मुसळधार पावसामुळे जणू गणेशाचे स्वागतच झाले.
मात्र, या पावसाने गणेशभक्तांची मोठी तारांबळ उडवली.
गणेश मूर्तिकारांच्या मंडपात अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा घेतला.
परंतु क्रिकेट क्लब मैदानावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले.
मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांना यातून मार्ग काढणे कठीण झाले.
अनेकांच्या गाड्याही चिखलात अडकताना दिसल्या.
दरवर्षी या बाजारपेठेत अशीच परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे भाविकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली असून,
चिखलमुक्त व व्यवस्थित व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.