देगावमध्ये रस्त्यासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू

आमरण उपोषण

ग्रामपंचायतीसमोर आंदोलन; ‘आश्वासन नको, कारवाई हवी’ची ठाम भूमिका

बाळापूर तालुका : तालुक्यातील देगाव येथे रस्त्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा आंदोलन भडकले आहे.

गावातील शेख दस्तगीर यांनी दोन दिवसांपासून

देगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सदर प्रकरणात गावातील कांशीराम गव्हाळे यांनी

शेजारील गावठाण शेतामध्ये प्लॉटिंग करून विक्री केली.

मात्र, त्या प्लॉटधारकांना स्वतंत्र रस्ता न देता शेख दस्तगीर यांच्या घरासमोरून रस्ता दिल्याचा आरोप होत आहे.

यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यापूर्वीही याच मुद्द्यावर शेख दस्तगीर यांनी आमरण उपोषण केले होते.

त्यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

परिणामी, पुन्हा एकदा शेख दस्तगीर यांनी “आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी”

या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

गावात या आंदोलनाची मोठी चर्चा असून ग्रामपंचायत प्रशासन कोणती भूमिका घेणार,

याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/vaishno-devi-margawar-dard-kosli-5-bhavik-thar-14-jakhmi-yatra-postponed/