आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
ही बैठक दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवरील संघटनांना एकत्र आणून आयोजित केली होती.
राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार,
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
हे तब्बल २० वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आले.
या घटनेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता जोर धरत आहे.
राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच गणेशोत्सवासाठी देखील निमंत्रण दिले असल्याची माहिती मिळाली आहे.
यापूर्वी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युती केली होती,
परंतु २१ जागांपैकी एकही जिंकता आली नाही.
या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का?
हा सवाल उपस्थित झाला होता.मालेगावमधील बैठकीत मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या
निवडणुकीसाठी एकत्र लढण्याचे संकेत दिसून आले आहेत.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी तसेच स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की, या बैठकीमुळे मालेगावच्या महापालिका निवडणुकीत मोठा बदल घडू शकतो.
मनसे-शिवसेना युतीमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/khasi-coaching-classescha-rural-shikshanawar-side-effects/