बॉम्ब निष्क्रीय करून पोलिसांनी दाखवली तत्परता

कारंज्यात समृद्धी महामार्गावर बॉम्बसदृश वस्तू

कारंजा शहर हादरलं! दहशतवादी हल्याची रंगीत तालीम, बॉम्ब निष्क्रीय करून पोलिसांनी दाखवली तत्परता

कारंजा (लाड) :राज्यात कुठेही दहशतवादी हल्ला घडल्यास त्याचा मुकाबला कसा करावा,

याची रंगीत तालीम (Mock Drill) कारंजा शहरात घेण्यात आली.

२६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १.३० वाजता

श्री. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोलनाक्यावर ही सराव तालीम रंगली.

घटनेचं नाट्य

संशयित गाडी

संशयित गाडी

टोलनाक्यावर संशयास्पद MH-37 AD-1297 क्रमांकाची डिझायर गाडी बराच वेळ उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वाहनात स्फोटकासारखा बॉक्स असल्याची शंका व्यक्त होताच पोलिस यंत्रणा धावून पोहोचली.

BDS पथकाची कारवाई

पथकाची कारवाई

पथकाची कारवाई

बॉम्ब शोधक कुत्र्यांच्या मदतीने तपासणी करताना वाहनात बॉम्बसदृश वस्तू आढळून आली.

त्वरित तंत्रज्ञानी उपकरणांच्या सहाय्याने ती निष्क्रीय करण्यात आली.

पोलिसांची तयारी सिद्ध 

पोलिस यंत्रणा

पोलिस यंत्रणा

या सरावात SDPO पाडवी (कारंजा), PI दिनेशचंद्र शुक्ला (कारंजा शहर),

ग्रामीण व शहर पोलीस, स्थागुशा, ATS, BDS, दविशा, वाहतूक शाखा, आरोग्य विभाग,

अग्निशमन दल अशा अनेक यंत्रणांनी सहभाग घेतला.

प्रशिक्षणात भव्य सहभाग

एकूण १५ अधिकारी, ८५ पोलीस अंमलदार तसेच आरोग्य, अग्निशामक दल,

प्रशासकीय कर्मचारी असे मोठ्या संख्येने यंत्रणा उपस्थित राहिल्या.

 या रंगीत तालीमीतून कारंजा पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी तत्परता,

कार्यपद्धती व समन्वयाचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले.

Read also :  https://ajinkyabharat.com/quality-knowledge-required-judge-prasad-thackeray/