खासगी बसला अपघात; ११ प्रवासी जखमी

दारव्हा–यवतमाळ मार्गावर बस पलटी; ११ प्रवासी जखमी

कारंजा : दारव्हा–यवतमाळ रस्त्यावरच्या कामठवाडा फाट्याजवळ २३ ऑगस्टच्या मध्यरात्री खासगी बस पलटी होऊन ११ प्रवासी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथून यवतमाळमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या डीएमआर ट्रॅव्हल्सच्या बसचा समोरील टायर फुटल्याने बस अनियंत्रित

होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या अपघातात दर्शना बेलसरे (२७, यवतमाळ), जयसिंग ठाकूर (३९, चंद्रपूर), पार्वताबाई मेसेकर (४०), श्रावणी मेसेकर (२२, पात्री), आदर्श रत्नमाल (२२,

चंद्रपूर), प्राची कातरकर (२४, वणी), सुबल मंडल (२९, गडचिरोली), दीपा लखदिवे (४७), दिव्या लखदिवे (१७),

गौरव लखदिवे (२२, चंद्रपूर) व सपना गेडाम (३९, पुणे) हे जखमी झाले आहेत.

स्थानिक रुग्णवाहिका सेवकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन गंभीर जखमींना अमरावती येथे हलविण्यात

आले, तर उर्वरित प्रवासी उपचारानंतर घरी परतले. या घटनेचा तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.

समृद्धी महामार्गावर कार अपघात; तिघे जखमी

कारंजा : समृद्धी महामार्गावर २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता झालेल्या कार अपघातात तिघे जखमी झाले.

ही घटना शेलूबाजार हद्दीत चॅनेल क्रमांक २२४ वर घडली.

ओडिशाहून पुण्याकडे जाणाऱ्या कारने समोरील वाहनाला मागून जोरदार धडक दिली.

यात सुदर्शन दास (७६), सुप्रसिद्धा मलिक (३०) व रामलेंदु मलिक (१७, तिघेही रा. ओडिशा) हे जखमी झाले.

जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून पायलट खिल्लारे, डॉ. सावरकर यांनी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी शिवनेरी

रुग्णवाहिकेचे विनोद खोंड व गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे सेवक रमेश देशमुख यांनीही मदतकार्य केले.

जखमींवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/dabki-rhodwar-poisanchi-dhadak-action-10-jugari/