रॅलीत गोंधळ : तरुणाने राहुल गांधींना किस करताच सुरक्षा रक्षकांनी फटकावलं, सुरक्षेत मोठी चूक

पूर्णियात राहुल गांधींना किस प्रकरण; सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी उघड

पूर्णिया  – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी उघड झाली आहे.

पूर्णिया येथे झालेल्या मतदार हक्क यात्रेदरम्यान बाईक रॅली सुरु असताना एका तरुणाने अचानक रॅलीत घुसून राहुल गांधींना किस केलं.

काही क्षणांसाठी वातावरण तंग झालं, मात्र सुरक्षा रक्षकाने तातडीने त्या तरुणाला पकडून फटकावलं.

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काय घडलं रॅलीत?

राहुल गांधी बुलेटवरून बाईक रॅलीचे नेतृत्व करत होते. त्यांच्या मागे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम बसले होते. अचानक एका तरुणाने गर्दीतून आत येत

राहुल गांधींच्या जवळ येत त्यांना किस केले. सुरक्षा रक्षकांनी त्वरित कारवाई करत त्याला बाजूला करून कानाखाली मारली.

त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं.

राहुल गांधींचे गंभीर आरोप

घटनेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला.

ते म्हणाले – “कोट्यवधी बिहारी लोकांच  मत चोरी झाल्याचा आम्हाला विश्वास आहे.

महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकमध्येही मतदार यादीत गडबड झाली. आयोगाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा.

आता बिहारमध्ये मत चोरी होऊ देणार नाही.”

काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह

‘मतदार हक्क यात्रा’ दरम्यान राहुल गांधींना बाईकवर पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

हजारो लोक रस्त्यावर जमा होऊन या यात्रेत सहभागी झाले.

Read also :https://ajinkyabharat.com/akola-bhandya-spending-rugnachaya-treaty-treatment/