नवे आरोग्य उपसंचालकपदी डॉ. सुशिलकुमार वाकचौरे यांची नियुक्ती

वाकचौरे

अकोला : अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांची एनआरएचएम मुंबईच्या सहसंचालक

पदी प्रशासकीय बदली करण्यात आली असुन त्यांंच्या रिक्त होणाऱ्या जागेवर नंदुरबार येथील कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. सुशिलकुमार वाकचौरे यांची

बदली करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वेतनस्तर एस- 25 व त्यावरील

संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देण्याचे आदेश शुक्रवार (ता.22) निर्गमीत केले आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा अकोला मंडळाचे उपसंचालक

पदावर कार्यरत डॉ. कमलेश भंडारी याची एनआरएचएम मुंबईच्या सहसंचालक पदावर बदली करण्यात आली असुन त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदी नंदुरबार

येथील कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. सुशिलकुमार वाकचौरे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात आरोग्य विभागातील

भांडार विभागातील घोट्याळातील दोषींवर कारवाई करण्यात उपसंचालक कार्यालयाकडून चालढकल करण्यात आली होती. यासोबतच जिल्हा स्त्री

रुग्णालयातील एसएनसीयु भरती घोटाळा उघडकीस आला असुन या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडीने

आरोग्य उपसंचालक कार्यालयात आंदोलन केल्याने उपसंचालक कार्यालय पुन्हा चर्चेत आले होते.

Read also :https://ajinkyabharat.com/utsav-tanha-bairajacha-vyankatesh-balaji-schoolmadhyay-sjra-sajra/