हिवरखेड – ऐतिहासिक देवळिवेस श्री शंकर सस्थान येथे पारंपरिक पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सहाव्या वर्षीपासून राबविण्यात येणारा हा उपक्रम स्व. भाऊसाहेब फुंडकर कृषी मित्र परिवार व स्व.
डॉ. का. शा. तिडके स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.शंकर सस्थानात भगवान शंकराचा अभिषेक, महाआरती होऊन गुढी व मानाचा बैल मिरवणुकीत आणल्यानंतर पोळ्याचा प्रारंभ
झाला. शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलजोड्यांचे निरीक्षण करून उत्कृष्ट जोड्यांना पारितोषिके देण्यात आली.
पारितोषिक विजेते व देणगीदार :
प्रथम क्रमांक (₹5001) : ओम अस्वार यांचे ऑपरेशन सिंदूर — स्व. भाऊसाहेब फुंडकर जयंतीपर्व स्मृती कृषी मित्र परिवार
द्वितीय क्रमांक (₹2111) : अशोक अस्वार यांचे शिवपिंडी — स्व. डॉ. का. शा. तिडके स्मृती प्रतिष्ठान
तृतीय क्रमांक (₹2100) : राहुल देवीदास नाठे — गजानन भटकर
चतुर्थ क्रमांक (₹2100) : रामा येलोकार — नागवेली कृषी सेवा केंद्र, जयभोले एजन्सी, रुची कृषी सेवा केंद्र
पंचम क्रमांक (₹1500) : गजानन भाकरे — राठी कृषी सेवा केंद्र
षष्ठ क्रमांक (₹1501) : आषुतोष तिडके — वृषाली सेवा केंद्र
सप्तम क्रमांक (₹1100) : अजय मानकर — महेंद्र भोपळे
अष्टम क्रमांक (₹1100) : गजानन दामधर — सुधाकर डालके
विशेष बक्षिस (₹1500) : प्रविण येऊल — शेतकरी पुण्य अग्रो सर्व्हिस, निसर्ग कृषी सेवा केंद्र, अमूल दूध संकलन केंद्र
वैयक्तिक विशेष बक्षिस : विविध शेतकरी — अनिल कराळे
निरीक्षण समितीत अनिल कराळे, आनंद बोहरा, श्रीकृष्ण उंबरकर, गजानन मानकर, गजानन भटकर, विलास घुंगड, रवी मानकर आदींचा समावेश होता. यावेळी वृषभ राजा सन्मान सोहळाही पार पडला.
पोळा उत्सवात ठाणेदार गजानन राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच चंडिका चौक, फत्तेपुरी सस्थान, पुरातन महादेव सस्थान, भवानी मंदिर येथेही पोळा उत्सव व बक्षीस वितरण सोहळे पार पडले.