बोर्डीत अनोखा उपक्रम : बैलांसोबत गाढवांचा ‘पोळा’

बोर्डीत अनोखा उपक्रम

अकोट  – भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे वैशिष्ट्य वेगळे असून शेतकरी वर्गात बैलपोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

शेतकऱ्यांचा निष्ठावंत मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांचे पोळ्याच्या निमित्ताने पूजन करण्यात येते. हा पारंपरिक सण भाद्रपद अमावास्येला बोर्डीत उत्साहात साजरा करण्यात आला.

बैलांची रंगीबेरंगी सजावट करून गावातून दिंडीसह मिरवणूक काढण्यात आली. गावातील नागास्वामी महाराज व हनुमान संस्थान येथून अंगारा लावून सर्व बैलांना आठवडी बाजारात

एकत्र आणले. विधीवत पूजा, आरती झाल्यानंतर बैलांना पुरणपोळीची मेजवानी देण्यात आली. घराघरांत सुवासिनींनी बैलांचे पूजन-औक्षण केले.

लहान मुलांसह सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला.

यंदा मात्र या पोळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते गाढवांचा पोळा. ढोले कुटुंबीयांनी आपल्या गाढवांना बैलांसमान सन्मान देत रंग लावून सजवले.

बँड पथकासह गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

बोर्डीत झालेला हा दुहेरी पोळा – बैलांचा आणि गाढवांचा – परंपरा व आधुनिकतेचा सुंदर संगम ठरला.

Read also :https://ajinkyabharat.com/recorderyl-gujranshi-theate-dialogue/