बालाजी इंग्लिश शाळेचे तालुक्यात घवघवीत यश

बालाजी

बाळापूर – बालाजी इंग्लिश स्कूलने तालुका स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून सहा विद्यार्थी जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत.

ही स्पर्धा जस नागरा विद्यालय, रिधोरा येथे पार पडली.

पात्र ठरलेले विद्यार्थी :

  • वेदिका ताले

  • कार्तिकी ताले

  • प्राची भारसाकळे

  • सुरज घाटोळ

  • श्रीप्रसाद सोनटक्के

  • महेश मावलकर

या यशामध्ये क्रीडा शिक्षक ठाकरे सर, प्रवीण इंगळे सर व अक्षय वरोकार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास वरोकार, मुख्याध्यापक दीपक मसने सर, पांडे मॅडम,

सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Read also :  https://ajinkyabharat.com/murtijapur-tehsil-office-bull-pole-movement/