स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादक गटाचा उपक्रम

शेतकरी

वाजतगाजत निघाली सजवलेल्या ट्रॅक्टरची रॅली

अकोट तालुक्यातील रौंदळा गावात यंदा बैलपोळ्याच्या निमित्ताने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादक गट, रौंदळा यांच्या वतीने गावात प्रथमच “ट्रॅक्टर पोळा” आयोजित करण्यात आला.

परंपरेने शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या बैलपोळ्याला आधुनिक स्वरूप देत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.

बदलत्या काळात पशुधनाची संख्या घटली असली तरी शेतकऱ्यांचे आपल्या शेतीपयोगी साधनांवरचे प्रेम कमी झालेले नाही.

याच भावनेतून ट्रॅक्टर पोळ्याची कल्पना पुढे आली.

खांदमळणीच्या दिवशी हा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.

गावातील शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर पारंपरिक पद्धतीने सजवून पोळ्यात सहभागी केले. वाजतगाजत ट्रॅक्टरची रॅली गावभर काढण्यात आली.

गावकरी मोठ्या उत्साहाने हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी जमले होते.

या उपक्रमाला स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले होते.

उत्कृष्ट सजावट करणाऱ्या ट्रॅक्टरना पहिल्या तीन क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

पंचांनी सर्व सहभागी ट्रॅक्टरचे परीक्षण करून निकाल जाहीर केला.

शेवटी गटाच्या सदस्यांनी या उपक्रमामागचा हेतू गावकऱ्यांसमोर स्पष्ट केला.

पारंपरिक बैलपोळ्याचे महत्त्व कमी करण्याचा उद्देश नसून, शेतकऱ्यांच्या प्रत्येक उपयुक्त साधनाचा गौरव व्हावा हा हेतू असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी ट्रॅक्टर मालकांचा टोपी व दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला.

गावकरी, शेतकरी आणि गटाचे सर्व सदस्य उत्साहाने सहभागी झाल्याने हा अनोखा पोळा संस्मरणीय ठरला.

Read also : https://ajinkyabharat.com/ajit-pavrancha-gesture/