अजित पवारांचा इशारा : “योग्य वेळ आल्यावरच शेतकरी कर्जमाफी”

पवारांचा

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“आता लाडकी बहिण आणि वीज माफीवर काम सुरु आहे. कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात आहे.

मात्र योग्य वेळ आल्यावरच कर्जमाफीचा निर्णय घेऊ,” असं अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांची अपेक्षा

सध्या बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. आधीच कर्जाचं ओझं, त्यात मुसळधार पावसामुळे झालेलं पिकांचं नुकसान.

अशा परिस्थितीत शेतकरी कर्जमाफीची मागणी होत आहे. माजी आमदार बच्चू कडू यांनी या मागणीसाठी आंदोलनही उभारलं.

यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ, आणि तो वेळ आल्यावर सांगू.”

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

अजित पवार म्हणाले, “राज्यातील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. यंदा राज्य सरकारने हा उत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे.

मानाच्या गणपतींशी चर्चा करून सकाळी लवकर मिरवणुका काढण्याबाबत नियोजन केले जाईल. मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत सुरू राहील.

विसर्जनाच्या दिवशी पूर्ण दिवस मेट्रो धावणार आहे.”

पुरंदर विमानतळ व भूसंपादन

पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाबाबत अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारने विमानतळ करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही गावांमध्ये १२८५ एकर जमीन भूसंपादनासाठी घेण्यात येणार आहे.

विरोध करणाऱ्यांशी चर्चेतून तोडगा काढू आणि ज्यांची घरे जातील त्यांना योग्य मोबदला दिला जाईल.”

पावसाच्या परिस्थितीवर लक्ष

राज्यातील अतिवृष्टीबाबत अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, “धरणं भरलेली आहेत. रेड अलर्ट धोका टळला आहे.

काही भागात पिकांचं नुकसान झालं आहे. पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत.

भीतीचं कारण उरलेलं नाही, मात्र नागरिकांनी खबरदारी घ्यावी.”

Read also :  https://ajinkyabharat.com/historical-holiday/