नागपूरमध्ये भोंदूबाबा हबीबुल्ला मलिकला अटक; चहा टपरीवरून माहिती गोळा करणे बनलं दुःस्वप्न
नागपूर | प्रतिनिधी
नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. हबीबुल्ला मलिक उर्फ ‘मामा’ नावाचा भोंदूबाबा, जो गेल्या 20 वर्षांपासून नागपूरमध्ये स्थायिक आहे,
त्याच्यावर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, भोंदूबाबा नेहमी चहा टपरीवर थांबून लोकांच्या घरगुती समस्या ऐकायचा आणि गुप्तपणे माहिती गोळा करायची. गरीब आणि कष्टकरी
लोकांच्या भोंदूबाबा लक्ष्यावर असायचा. मदतीच्या बहाण्याने, “काळी जादू करून संकट दूर करेन” असे सांगत, त्याने पीडित महिलेच्या घरात प्रवेश मिळवला
आणि वारंवार अश्लील कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
भोंदूबाबाने महिलेला कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. मात्र पीडित महिलेने हिंमत दाखवत पोलिसांत तक्रार नोंदवली आणि त्यानंतर
आरोपीवर कारवाई करण्यात आली.
नागपूर पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/vima-policy-honar-honar-swast/