पोपटखेड येथे तब्बल 10 फुटांचा अजगर

पोपटखेड येथे तब्बल 10 फुटांचा अजगर

अकोला  – जिल्ह्यातील पोपटखेड येथे तब्बल 10 फुटांचा अजगर आढळून आला.

शेतात अचानक अजगर दिसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र तात्काळ धाडस दाखवत सर्पमित्र सचिन भिवगडे, साजन जावळे, सचिन सुरगाये, करण टेकाम आणि आकाश कटोते यांनी या अजगराला सुरक्षित रित्या पकडले.

यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अजगराला जंगलात सोडून देण्यात आले.

या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून सर्पमित्रांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Read also :  https://ajinkyabharat.com/panganganga-dhichaya-purat-vadha-prashanchacha-vigilance-gesture/