सावरा येथे पाच माजी सैनिकांचा सत्कार समारंभ

सावरा येथे पाच माजी सैनिकांचा सत्कार समारंभ

अकोट : तालुक्यातील सावरा (मंचनपूर) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैन्य दलातील पाच सेवानिवृत्त सैनिकांचा गौरवपूर्ण सत्कार समारंभ पार पडला.

सिद्धार्थ मंडळ, सावरा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सैनिकांच्या शौर्याचा आणि सेवेचा सन्मान करण्यात आला.

सेवानिवृत्त सैनिकांमध्ये बाळकृष्ण महादेवराव धांडे, विजय सुरेश धांडे, संदेश पद्माकर धांडे, सारीपुत्र हरिभाऊ धांडे व निशांत रामभाऊ धांडे यांचा समावेश आहे.

भारतीय सैन्य दलातील सेवेतून निवृत्त झालेल्या या वीर जवानांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बोधिसत्व विहारामध्ये शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, गावकरी व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिकांचा सत्कार झाल्याने गावभर अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/motha-research-shastramani-shodi-vastarakha-nava-planet/