मोठा शोध! शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीसारखा नवा ग्रह

मोठा शोध! शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीसारखा नवा ग्रह

मोठा शोध! शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीसारखा नवा ग्रह – जीवन शक्यतेची चिन्हं

नवी दिल्ली :
मानवजातीसाठी उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) च्या मदतीने पृथ्वीसारखाच एक ग्रह शोधला आहे,

जिथे जीवन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ग्रहावर पाणी असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हा ग्रह आपल्या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती म्हणजेच अल्फा सेंटॉरी A च्या भोवती फिरतो आहे.

अल्फा सेंटॉरी त्रि-तारा प्रणालीतील या ग्रहाला सध्या अल्फा सेंटॉरी Ab असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे.

‘गोल्डीलॉक्स झोन’ मध्ये नवा ग्रह

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हा ग्रह जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोल्डीलॉक्स झोनमध्ये स्थित आहे.

म्हणजेच येथे तापमान व परिस्थिती मानवी जीवनासाठी पोषक असू शकते. त्यामुळे हा शोध खगोलशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

शास्त्रज्ञांचे म्हणणे

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे खगोलशास्त्रज्ञ अनिकेत सांघी म्हणाले की, “हा ग्रह आपल्या ताऱ्याच्या अगदी जवळ असून, आतापर्यंत पाहिलेल्या सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक पृथ्वीसारखा वाटतो. यामुळे आपल्या सौरमंडलापलीकडे जीवनाच्या शोधात हा शोध क्रांतिकारी ठरणार आहे.”

 ग्रहाचे वैशिष्ट्य

  • या ग्रहाचे द्रव्यमान शनाएवढे असल्याचे समोर आले आहे.

  • हा ग्रह अल्फा सेंटॉरी A च्या भोवती दीर्घवृत्ताकार मार्गावर फिरतो.

  • पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या १ ते २ पट अंतरावर तो परिक्रमा करत आहे.

 मोठी उपलब्धी

प्रत्यक्ष इमेजिंगद्वारे शक्य झालेला हा शोध बाह्य ग्रह विज्ञानातील मोठा टप्पा मानला जात आहे.

जर याची पुष्टी झाली, तर पृथ्वीसारख्या ग्रहाच्या शोधात हा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा टप्पा ठरेल.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/power-aali-gali-pan-ndni-kadhi-udi-marli-naahi-jayant-patil/