अकोला –अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने कौलखेड चौक परिसरात मोठी कारवाई करत ऑनलाइन जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.
या धाडीत 86 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुप्त बातमीदारामार्फत 14 ऑगस्ट रोजी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने कौलखेड चौक येथे छापा टाकला.
Related News
कारवाईत आरोपी कमलेश मोहनलाल रोहरा (वय 35, रा. कच्ची खोली, सिंथी कॅम्प, अकोला) हा कॅसिनो या गेम्सच्या माध्यमातून पैश्यावर हारजित लावून जुगार खेळविताना पकडला गेला.
पोलिसांनी घटनास्थळावरून मॉनीटर, सीपीयू माऊस, की-बोर्ड, वाय-फाय राऊटर, रिसीट प्रिंटर, इलेक्ट्रिक बोर्ड, एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 86 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके (स्थानिक गुन्हे शाखा, अकोला),
सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोहवा फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, पो.कॉ. राज चंदेल, आकाश मानकर, धीरज वानखेडे, मो. आमीर व चालक पो.कॉ. देवानंद खरात यांनी केली.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/polis-dalatrfe-run-for-drugs-free-india-marrathon-competition/
