पोलीस दलातर्फे “रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया” मॅरेथॉन स्पर्धा

पोलीस दलातर्फे “रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया” मॅरेथॉन स्पर्धा

अकोला पोलीस दलातर्फे “रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया” मॅरेथॉन स्पर्धा

अकोला – देशासमोरील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेपैकी एक मोठे आव्हान असलेला ड्रग्जचा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र

सरकारतर्फे देशव्यापी अंमली पदार्थ जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे “रन फॉर ड्रग्ज फ्री इंडिया” ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Related News

मा. पोलीस अधीक्षक अर्वित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ३ किमी अंतराची ही मॅरेथॉन १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता पोलीस मुख्यालयातून सुरू होणार आहे.

मार्गक्रमणात पोलीस मुख्यालय, सरकारी बगीचा, कलेक्टर ऑफिस, अशोक वाटीका, सिंधी कॅम्प चौक, निमवाडी पोलीस लाईन, लक्झरी बस स्टँड येथून पुन्हा पोलीस मुख्यालय येथे समारोप होईल.

अंमली पदार्थांच्या धोक्यांबद्दल जनजागृती, धारणा बदल आणि समाजाला कृतीस प्रवृत्त करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही मॅरेथॉन सर्वांसाठी खुली असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/every-house-tricolor-human-credentials-and-prabhatferi/

Related News