भरत गोगावले म्हणाले – ‘पालकमंत्री किस बात की चीज’

भरत गोगावले म्हणाले – ‘पालकमंत्री किस बात की चीज’

भरत गोगावले म्हणाले – ‘पालकमंत्री किस बात की चीज’; आदिती तटकरेंना रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान, पुन्हा वादंग

रायगड – महायुती सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद पुन्हा पेटला आहे.

शासनाने १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी जाहीर केलेल्या यादीत रायगडचा मान पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे.

त्यामुळे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच जाणार असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

रायगडच्या माणगाव येथे शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा पार पडला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदावर भाष्य केले.
“ज्या मावळ्यांनी अडीच वर्षांसाठी मंत्रिपद सोडले, त्याला पालकमंत्री किस बात की चीज है.

महाराष्ट्राच्या इतिहासात पालकमंत्रिपद सोडल्यामुळे माझं नाव कोरलं गेलं आहे.

पण बाबा मुख्यमंत्री आणि मीही मंत्री व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी केलं नाही,” असे म्हणत गोगावलेंनी नाव न घेता सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर रोष व्यक्त केला.

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन कमी झाले का, असा सवाल विचारल्यावर गोगावले म्हणाले – “अजिबात नाही.

शिंदे साहेबांचे वजन कमी झाले असते, तर आम्ही उठाव केलेल्या पालकमंत्रीपदावर स्टे लागला नसता.”

थोरवे यांचा तटकरे कुटुंबावर हल्लाबोल

या वादात आमदार महेंद्र थोरवे यांनीही उडी घेतली. “अदिती तटकरेंचे नाव ध्वजारोहणासाठी जाहीर झाले असले तरी भरतशेठच रायगडचे पालकमंत्री होतील.

सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, आता आमची वेळ आहे,” असे थोरवे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना याबाबत पूर्ण कल्पना असून तेच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवारांनी देखील रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवले होते, पण त्यावर थोरवे यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/doht-budanya-mulala-vachwanya-ankushcha-hatskar/