नोएडा : महिला अधिकाऱ्यांचा IAS अधिकाऱ्यावर मानसिक व लैंगिक छळाचा आरोप, मुख्यमंत्री योगींना तक्रारपत्र
नोएडा येथे राज्य कर विभागात कार्यरत असलेल्या काही महिला अधिकाऱ्यांनी वरिष्ठ IAS अधिकारी संदीप भागिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या तक्रारपत्रात मानसिक छळ, लैंगिक छळ आणि धमकावल्याचे आरोप नोंदवले आहेत.
महिला अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या चार महिन्यांपासून नोएडा झोनमध्ये कार्यरत असलेले संदीप भागिया कार्यालयात
तासन्तास टक लावून पाहतात, रात्री व्हिडिओ कॉल करतात, महिलांच्या परवानगीशिवाय व्हिडिओ बनवतात.
विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा कामचुकारपणाचे खोटे आरोप करून त्रास दिला जातो, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, संदीप भागिया महिला कर्मचाऱ्यांना ‘नोकरीवरून काढून टाकेन’ किंवा ‘तुम्हाला बर्बाद करून टाकेन’ अशा धमक्या देतात.
त्यामुळे महिला अधिकारी मानसिक तणावाखाली असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाला गांभीर्याने घेत राज्य महिला आयोगाने गुप्त व निष्पक्ष तपासाचे आदेश दिले आहेत.
प्रकरणाची चौकशी सुरू असून प्रशासनात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.