अंबानी कुटुंब पुन्हा नंबर वन; हुरुन इंडियाच्या २०२५ अहवालात भारतातील टॉप १० श्रीमंत फॅमिली बिझनेस जाहीर
मुंबई : भारतातील अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलणाऱ्या फॅमिली बिझनेसची यादी हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. ‘हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस २०२५ ’ अहवालानुसार अंबानी कुटुंबाने यंदाही अव्वल स्थान मिळवले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब २८.२ लाख कोटी रुपयांच्या संपत्ती सह पहिल्या क्रमांकावर आहेत. ही रक्कम भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास १२ टक्के आहे. ऊर्जा, डिजिटल आणि किरकोळ विक्री क्षेत्रात अंबानींचा मजबूत दबदबा आहे. १९५७ मध्ये सुरु झालेला हा व्यवसाय आता दुसरी पिढी सांभाळत आहे.
दुसऱ्या क्रमांकावर ६.५ लाख कोटींच्या संपत्तीसह कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील आदित्य बिर्ला ग्रुप आहे. सिमेंट आणि मेटल इंडस्ट्रीमध्ये बिर्ला कुटुंबाचा दीर्घ वारसा असून १८५० पासून या व्यवसायाची परंपरा सुरु आहे.
तिसऱ्या स्थानावर ५.७ लाख कोटी संपत्तीसह सज्जन जिंदल यांच्या नेतृत्वाखालील JSW ग्रुप आहे. धातू आणि खाणकाम क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे.
हुरुन लिस्ट २०२५ – भारतातील टॉप श्रीमंत कुटुंबे:
अंबानी – ₹२८.२ लाख कोटी
बिर्ला – ₹६.५ लाख कोटी
जिंदल – ₹५.७ लाख कोटी
बजाज – ₹५.६ लाख कोटी
महिंद्रा – ₹५.४ लाख कोटी
नाडर – ₹४.७ लाख कोटी
मुरुगप्पा – ₹२.९ लाख कोटी
प्रेमजी – ₹२.८ लाख कोटी
अनिल अग्रवाल – ₹२.६ लाख कोटी
दानी, चोकसी, वकील (एशियन पेंट्स) – ₹२.२ लाख कोटी
हुरुनच्या अहवालानुसार, भारतातील फॅमिली बिझनेसच्या सर्वाधिक नफा देणाऱ्या क्षेत्रांमध्ये ऊर्जा, वित्तीय सेवा आणि सॉफ्टवेअर-आयटी यांचा समावेश आहे.
READ ALSO:https://ajinkyabharat.com/43-kotinchya-angathi-ronaldocha-sakharpuda/
