सोन्या-चांदीच्या बाजारातून सध्या खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली असून, गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी हा सोन्याचा हंगाम आहे.
इंडियन बुलेटीन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ₹९९,९५७, प्रति १०, ग्रॅम झाला आहे,
तर चांदीचा दर ₹१ ,१३,०५१ प्रति किलो इतका खाली आला आहे.
आजचे दर (मंगळवार – IBJA)
२४ कॅरेट : ₹९९९५७ / १० ग्रॅम
२३ कॅरेट : ₹९९,५००, / १० ग्रॅम
२२ कॅरेट : ₹९१,६०० / १० ग्रॅम
१८ कॅरेट : ₹७४,९६८ / १० ग्रॅम
१४ कॅरेट : ₹५८,३२४ / १० ग्रॅम
तज्ज्ञांच्या मते, जागतिक तणाव आणि शुल्कावरील अनिश्चितता कमी झाल्याने किमतीत ही घसरण झाली आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पुन्हा बिघडल्यास सोन्याचा भाव झपाट्याने वाढू शकतो. त्यामुळे लग्नसराई, गुंतवणूक किंवा दागिन्यांची खरेदी यासाठी आता सर्वोत्तम वेळ असल्याचे सराफ सांगत आहेत.
Read also :https://ajinkyabharat.com/jatrasathi-hapte-uklyacha-type-ughad-three-polysanwar-suspension/
