नायगावमध्ये अल्पवयीन बांगलादेशी मुलीची सुटका; दोनशे वेळा अत्याचाराचा थरारक उलगडा

नायगावमध्ये अल्पवयीन बांगलादेशी मुलीची सुटका; दोनशे वेळा अत्याचाराचा थरारक उलगडा

नायगावमध्ये अल्पवयीन बांगलादेशी मुलीची सुटका; दोनशे वेळा अत्याचाराचा थरारक उलगडा

नायगाव (वसई) | मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने २६  जुलै रोजी

नायगाव येथील एका ठिकाणी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत केवळ १२  वर्षांच्या बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली.

तपासात उघड झाले की, एका बांगलादेशी दलाल महिलेने पीडितेला बांगलादेशातून कोलकात्यात आणि तेथून मुंबईत आणले.

नंतर तिच्यावर वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

हार्मोन्स वाढवण्यासाठी तिला इंजेक्शन दिले गेले तसेच बोगस आधार कार्ड तयार करून वय २१ वर्षे दाखवण्यात आले.

या मुलीवर महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकातील विविध ठिकाणी नेऊन तब्बल २००  वेळा अत्याचार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी नऊ आरोपींना अटक झाली असून, त्यात दोन महिला आणि तिघे महाराष्ट्रीयन दलालांचा समावेश आहे.

उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके इतर राज्यांत रवाना झाली आहेत.

या अमानुष घटनेने संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/the-bjp-is-the-evm-hakache-the-educational-vines/