सोमवारी धारगड, मंगळवारी बोर्डीची यात्रा; हजारो भाविकांची गर्दी अपेक्षित

सोमवारी धारगड, मंगळवारी बोर्डीची यात्रा; हजारो भाविकांची गर्दी अपेक्षित

बोर्डी ग्रामदैवत श्री. नागास्वामी महाराज यात्रा महोत्सवाला उत्साहाची लगबग
सोमवारी धारगड, मंगळवारी बोर्डीची यात्रा; हजारो भाविकांची गर्दी अपेक्षित

अकोट (प्रतिनिधी) :
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाच्या

बोर्डी गावात येत्या मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) ग्रामदैवत संत नागास्वामी महाराजांची यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

सोमवारी धारगड यात्रा भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या यात्रेसाठी मंदिर समितीकडून जय्यत तयारी सुरू असून, परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत.

संत नागास्वामी महाराज हे सुमारे २२६ वर्षांपूर्वी “श्रीरामगीरी गोसावी” म्हणून प्रकट झाले असे  भाविकांकडून सांगण्यात येते.

मोहबंधनातून मुक्त असल्यामुळे पंचक्रोशीत त्यांना ‘नागास्वामी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

महाराज धुनी लावून बसत आणि अत्रपूर्णा मातेची पूजा, आरती व जप करीत असत.

असाध्य आजारांवरील उपचारासाठी भाविक येथे येत आणि महाराजांकडून मिळणाऱ्या अंगाऱ्याने रुग्ण बरे होत असल्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात.

दुष्काळाच्या काळात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून त्यांनी पावसाची वृष्टी घडवून आणल्याचा प्रसंगही ग्रामस्थ आजही स्मरतात.

यात्रेनिमित्त सात दिवस अखंड टाळ-मृदंगाचा हरिनाम सप्ताह पार पडतो.

आठव्या दिवशी महाराजांच्या पादुका रथावर ठेवून गावात भव्य मिरवणूक काढली जाते.

रथ दोराच्या साहाय्याने ओढून गाव प्रदक्षिणा घालतो.

विदर्भातील अनेक भागांतून भजनी मंडळी, वारकरी दिंड्या, शिवभक्त या यात्रेत सहभागी होतात.

दुपारी १२ वाजता काल्याचे कीर्तन झाल्यानंतर रथयात्रेला सुरुवात होते.

मंदिराचे पुरातन वास्तुशिल्प, कोरीव नक्षीकाम व अत्रपूर्णा मातेचे भुयारी मंदिर भाविकांचे आकर्षण आहे.

रथयात्रेसोबतच मंदिराची रंगरंगोटी, रोशनाई आणि सजावटही यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

याशिवाय वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात — माघ शु. सप्तमीला गजानन महाराज प्रकट दिन, मार्गशीर्ष ९३ ला गाडगे महाराज पुण्यतिथी,

वैशाख पौर्णिमा पंचमीला तुकडोजी महाराज पुण्यतिथी,

षष्ठीला संत नागास्वामी महाराज पुण्यतिथी, तसेच भाद्रपद शु. षष्ठीला ऋषिपंचमीला संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा.

या परंपरा आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे बोर्डी गावाला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/protection-minister-rajnath-singh-yancha-torif-dhorananwar-vigorously/