पातुर कापशी रोडवरील उडाण पुलावर भीषण अपघात

पातुर कापशी रोडवरील उडाण पुलावर भीषण अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मृतक अकोला येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती

पातुर-अकोला रोडवरील कापशी येथील उडाण पुलावर टाटा चारचाकी प्रवासी गाडीची एका दुचाकी वाहनाला समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एक अज्ञात व्यक्ती पुलावरून सुमारे १५ ते २० फूट खाली फेकल्या गेली. उंचावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान, अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पातुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. मृतक व्यक्ती हा अकोला येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.