गिरगाव चौपाटीवर दहा गोण्या धान्याचा खच; महापालिकेचा आरोपी शोध सुरू

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेकडून कबुतरखाने बंद

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेकडून कबुतरखाने बंद

करण्याची मोहीम सुरू असतानाच, गिरगाव चौपाटीवर न्यायालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन

झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मनाई असतानाही एका व्यक्तीने तब्बल दहा गोण्या धान्य क

बुतरांसाठी ओतल्याचे उघड झाले असून, याचा व्हिडीओही त्याने काढल्याची माहिती मिळते.

मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणापाणी देण्यास मनाई करताना, त्यांच्यामुळे नागरिकांच्या

आरोग्यावर होणारा धोका हा मुख्य कारण म्हणून नमूद केले होते.

तरीदेखील हा नियम मोडत काहीजण अजूनही कबुतरांना अन्न देत आहेत.

गिरगाव चौपाटीवरील या प्रकारामुळे महापालिकेने संबंधित व्यक्तीचा कसून शोध सुरू केला आहे.

पालिकेचे पथक अशा उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत असून, दाणे-धान्य टाकणाऱ्यांना

कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/sharad-pavarachanya-vasavyavar-deprived-bahujan-aghadich-hallabol/