शरद पवारांच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल!
मुंबई : विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
धक्कादायक वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
पवार यांनी दावा केला की, “विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक माझ्याकडे आले होते.
त्यांनी मला २८८ पैकी १८० जागा जिंकून देण्याची हमी दिली होती. मतांची फेरफार करून हे शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.”
पवारांच्या या खुलाशावर वंचित बहुजन आघाडीने जोरदार टीका केली आहे. पक्षाच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून
करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “शरद पवारजी, तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात! दोन लोकं
तुम्हाला भेटली, ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर
दिली आणि सांगितले की, ते तुम्हाला १६० विधानसभेच्या जागा जिंकून देतील.
तुम्ही म्हणत आहात की, तुम्हाला त्यांची नावे माहित नाहीत. तर ही गोष्ट स्पष्ट करा…”