सातपुड्याच्या पायथ्याशी, निसर्गरम्य कुशीत वसलेल्या ऐतिहासिक श्रीक्षेत्र धारगड येथेदरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणातील
तिसऱ्या सोमवारी पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात शिवयात्रा पार पडणार आहे.
रविवार १० ऑगस्ट सकाळी ८ वाजता सुरू होणारी ही यात्रा सोमवार ११ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत
चालणार असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत असलेल्या धारगडात वन विभागाच्या अटी-शर्तीनुसार ठराविक वेळेपर्यंतच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
अकोटपासून जवळ असलेले हे पौराणिक शिवतीर्थस्थान दरवर्षी भाविकांच्या गर्दीने फुलून जाते.
यात्रेच्या काळात अकोला आणि अमरावती जिल्हा पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
तसेच अकोट एसटी डेपोमार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली आहे.
अकोट शहरात रविवारी भाविकांसाठी चहा, फराळ आणि विविध स्टॉल्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेसाठी भाविक रविवारीच विविध मार्गांनी डोंगरदऱ्यांतून पावसाच्या सरी झेलत, ‘हर हर महादेव’च्या गजरात आणि महादेवाची
गाणी म्हणत धारगडकडे प्रस्थान करतात. सोमवारी सकाळपासून धारगड गुहेसमोरील पवित्र धारेखाली स्नान
करून मोठे व लहान शिवलिंगावर जलाभिषेक व पूजा-अर्चना करण्यासाठी भाविकांची रांग लागते.
Read also:https://ajinkyabharat.com/social-mediavruun-navneet-ranana-punha-jeeva-ghenyachi-threatened/