कोचिंग क्लासेसचा मनमानी कारभार ; शिवसेना शिंदे गटाचा प्रशासनाला इशारा

कोचिंग क्लासेसचा मनमानी कारभार ; शिवसेना शिंदे गटाचा प्रशासनाला इशारा

अकोला – अकोल्यातील कोचिंग क्लासेसमध्ये शिस्त व सुरक्षिततेसाठी ठोस नियम लागू करण्याची मागणी

करत शिवसेना शिंदे गटाने जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे.

क्लासेसमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात, प्रत्येक क्लासेसच्या इमारतीवर

महिला व बाल हेल्पलाइन क्रमांकाचा फलक लावणे बंधनकारक करण्याची, १६ वर्षांखालील

विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी लागू करण्याची, व्यवसाय परवाना अटींचे काटेकोर पालन करण्याची

आणि टवाळखोरांचा वावर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच, फी नियंत्रण आणि कर वसुलीची अंमलबजावणी करण्याबरोबरच, गैरप्रकारात अडकलेल्या क्लासेसवर बंदी

घालून त्यांचा परवाना रद्द करण्याची सूचना करण्यात आली. विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेऊन त्याची माहिती

पालकांना डिजिटल संदेशाद्वारे पाठवण्याची प्रणाली सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली.

Read Also :https://ajinkyabharat.com/stores/