राहुल गांधींच्या भेटीनंतरच पवार साहेबांना ईव्हीएमची आठवण? – फडणवीसांची टीका

राहुल गांधींच्या भेटीनंतरच पवार साहेबांना ईव्हीएमची आठवण? – फडणवीसांची टीका

मुंबई – आजपर्यंत शरद पवार यांनी कधीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला नव्हता.

उलट त्यांनी अनेकदा स्पष्ट भूमिका घेत ईव्हीएमला दोष देणे अयोग्य असल्याचे म्हटले होते.

मात्र, राहुल गांधी यांच्या अलीकडील भेटीनंतर पवार अचानक मतदान प्रक्रियेत फेरफार होऊ शकतो.

अशा विधानांवर बोलू लागले असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,

“मला एक गोष्ट लक्षात येत नाही, इतक्या दिवसांनी पवार साहेबांनी राहुल गांधी यांना भेटल्यावरच या सगळ्याची आठवण का आली? इतके दिवस काहीही बोलले नाहीत, आज अचानक बोलले. राहुल गांधी जशा सलीम-जावेदच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगतात, तशाच कहाण्या पवार साहेबही सांगू लागले की काय?”

शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दावा केला की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत

दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेऊन १६० मतदारसंघांत हमखास विजय मिळवून देण्याची ऑफर दिली होती.

मात्र, त्यांनी पारदर्शक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पवारांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, “विरोधक कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले, तरी भारताइतक्या पारदर्शक

पद्धतीने निवडणुका जगात कुठेच होत नाहीत. ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप

करणारे लोक जनतेसमोर बोलतात, पण आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत, शपथपत्र द्यायला तयार नसतात.

कारण त्यांना ठाऊक आहे की, खोटं उघड झालं तर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, हीच त्यांची पद्धत आहे.”

Read Also :https://ajinkyabharat.com/rakshabandhanachaya-tondavar-no-connection/