भाऊ बहिणीचे प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या राखी पौर्णिमेनिमित्त महानगरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी चौकाचौकात राख्यांची दुकाने थाटली गेली आहेत.
मात्र महानगरपालिकेने नुकतेच अतिक्रमण काढले असल्याने किरकोळ विक्रेत्यांचे दुकाने रस्त्यावर थाटली नसल्याने मोजक्याच दुकानात राख्या उपलब्ध आहेत.
यंदा प्रथमच मोठ्या संख्येने राख्या बाजारात आल्या आहेत.
यामध्ये निरनिराळया डिझाईनच्या आकर्षक राख्या आल्या आहेत
. बाजाराचा फेरफटका मारला असता विक्रेत्यांनी यंदा राख्याचे दर कमी असल्याचे सांगितले.
चायनीज राख्यावर बंदी आल्यामुळे स्थानिक उत्पादनांच्या राख्या मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे इतर आधुनिक राख्यापेक्षा पारंपारिक राख्यानाही जास्त प्राधान्य महिला आणि मुली देत आहेत.
महिलांनी आपल्या दुरवरच्या भावाला पोस्टाने राख्या पाठवणे सुरू केले असून पोस्टात राख्या पाठवण्याच्या पाकिटांचा खच पडल्याचे दिसून आला आहे.
या वर्षी हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला जाईल याचा आनंदही आता महिला मोठ्या संख्येने व्यक्त करीत आहे
. बाजारात अनेक वर्षांपासून पारंपरिक दुकाने थाटली जात असतात राखी पौर्णिमेच्या सर्व समाप्तीनंतर ही राख्यांची दुकाने अन्य मालांच्या विक्रीच्या दुकानात परावर्तित होतात.
राखी हा बारा महिने चालणारा व्यवसाय नसून हंगामी व्यवसाय असल्यामुळे अशा दुकानांना टिकल्या
बांगड्या ,कुंकू इतर मांगलीक आणि सुहागण उत्पादनाच्या विक्रीतून आपला व्यवसाय केल्या जात असतो.
पाऊस अधून-मधून हजेरी लावत असतांनाही गांधी रोड परिसरातील विविध दुकानात महिलांची राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याचे आढळून येत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-magchaya-ranget/