गांजाची तस्करी ; दोघे अटकेत..

गांजाची तस्करी ; दोघे अटकेत..

अकोला शहरातील रामदासपेठ पोलिसांनी रेल्वे स्टेशन चौकात नाकाबंदी दरम्यान १५ किलो गांजाची तस्करी

करताना दोन तस्करांना अटक केली.

आरोपी सोहेल अहमद अब्दुल शकील आणि शेख हमीद शेख रशीद हे ऑटोमधून गांजा वाहून नेत होते.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १५ किलो गांजा,

एक ऑटो आणि दोन मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई रामदासपेठ पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/darodhyachi-tayari-amravati-yehet-tighanna-stuck/