धामणगाव रेल्वे – बी.फार्मसीची १८ वर्षीय विद्यार्थिनी शुभांगी शिंदे हिचा यवतमाळ बायपासवर दुचाकी अपघातात मृत्यू झाला.
मित्रासोबत फेरफटका मारताना शुभांगी स्वतः दुचाकी चालवत होती तर तिचा मित्र मागे बसलेला होता.
शुभांगी ही मूळची हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील राहिवासी असून ती फार्मासि शिक्षणासाठी धामणगावत राहत होती.
शुभांगीचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोघे पडले. शुभांगीच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली.
नागरिकांनी मदतीऐवजी बघ्याची भूमिका घेतली. 112 सेवा चालक मनोज धोटे यांनी पुढाकार घेऊन दोघांना रुग्णालयात दाखल केलं,
मात्र उपचारादरम्यान शुभांगीने प्राण सोडले. अपघातामुळेच नव्हे,
तर समाजाच्या संवेदनशून्यतेमुळेही मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rough-and-tuff-group-turfe-idol-teacher-vijay-bhad-yancha-hospitality/