अकोला | 04 जुलै
रिधोरा गावातील बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी ११.२५ वाजता तब्बल ६ ते ७ फूट लांबीचा भलामोठा अजगर
आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दृश्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच MH30 अकोला जिल्हा सर्पमित्र टीमचे सूरज इंगळे, सूरज धायडे आणि अभय निंबाळकर
तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत दक्षतेने, कोणतीही इजा न करता, मोठ्या संयमाने अजगराला पकडले.
नंतर या अजगराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून वन विभागाने त्याचे पुन्हा नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन केले आहे.
रिधोरा बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी इतक्या मोठ्या अजगराचे आढळणे ही बाब चिंतेची असली
तरी सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे कोणतीही अप्रिय घटना टळली. गावकऱ्यांनी सर्पमित्रांच्या कामाचे कौतुक केले असून,
या प्रकारामुळे वन्यजीवांची रहदारी वाढल्याचे संकेत मिळत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/karajat-vishwamangalya-sabhechaya-matrishtichi-grand-kavad-yatra/
