रांची – झारखंड राज्य निर्मितीच्या लढ्याचे अग्रणी नेते आणि आदिवासी समाजाचे प्रमुख नेतृत्व
समजले जाणारे दिशोम गुरु शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे.
दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात आज सकाळी ८:५६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते.
नेमरा (रामगढ) येथील जन्म, महाजनी प्रथेविरोधातील संघर्ष,
धनकटी आंदोलन आणि आदिवासी हक्कासाठी झारखंड मुक्ति मोर्च्याची स्थापना हे त्यांचे जीवनपथ होते.
१९५७ मध्ये वडिलांच्या हत्या झाल्यानंतर त्यांनी अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा राज्यव्यापी झाला.
आदिवासींनी त्यांना “दिशोम गुरु” म्हणजेच ‘जमिनीचा नेता’ ही उपाधी दिली होती.
१९७२ मध्ये झारखंड मुक्ति मोर्च्याची स्थापना, आणि अखेर १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड राज्याची निर्मिती —
या साऱ्या टप्प्यांमध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी सहा वेळा लोकसभेची निवडणूक
जिंकली आणि कोळसा मंत्री तसेच तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासह झारखंडने एक मजबूत आणि प्रेरणादायी नेता गमावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chauhatabar-yhetheel-citizen-assistant-engineer-ghet-ahet-research/
