मालेगाव बॉम्बस्फोट खटला : आरोपी निर्दोष सुटले,

मालेगाव बॉम्बस्फोट खटला : आरोपी निर्दोष सुटले,

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले असून,

या निर्णयानंतर तपास अधिकाऱ्यांवर चौकशीचे सावट आले आहे.

न्यायालयाने दिलेल्या निकालात काही गंभीर बाबींची नोंद घेतली आहे.

यात आरोपीच्या घरात आरडीएक्स पेरल्याचा आरोप,

तसेच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख आहे.

त्यामुळे संबंधित तपास अधिकाऱ्यांची चौकशी दहशतवादविरोधी

पथक (ATS) मार्फत करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात आरडीएक्स

ठेवल्याचा आरोप एटीएस अधिकारी शेखर बागडे यांच्यावर आहे.

तसेच काही जखमींची वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट डॉक्टरांकडून तयार करून पुराव्यात दाखल करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे न्यायालयाने स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/female-polisacacha-doubt-death-doubt-doubt/