संतोष काकडे यांची जिल्हास्तरीय ‘उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणून निवड

संतोष काकडे यांची जिल्हास्तरीय ‘उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणून निवड

चिखली (संदीप सावळे)

महसूल दिनाच्या निमित्ताने चिखलीतील कार्यकुशल तहसीलदार संतोष काकडे यांची सन 2025 या वर्षासाठी

जिल्हास्तरीय उत्कृष्ट तहसीलदार / कर्मचारी म्हणून निवड आणि सन्मान सोहळ्याची घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे.

विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महसुली योजना यशस्वीपणे राबविणे, शासकीय जमिनींवरील अतिक्रमण काढणे,

शासकीय मालमत्तेची सरंक्षण करणे, जलसंधारण व जलयुक्त शिवार योजनेचे प्रभावीपणे कामकाज करणे,

विविध निवडणुका व महसूल प्रशासकीय कार्यात सहभाग, विविध सामाजिक उपक्रम राबवणे,

शासनाच्या धोरणांचा प्रभावीपणे अंमलबजावणी आदी कामगिरीत त्यांनी १३० पैकी ११७ गुण मिळविल्यामुळे

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शासन स्तरावर त्यांच्या नावाची निवड झाली आहे.

संतोष काकडे यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी तहसीलदार पदावर काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवीला आहे.

वेळोवेळी सोपवलेल्या कामामध्ये त्यांनी विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

दप्तर दिरंगाई टाळण्यासाठी आणि ई- गव्हर्नस राबविण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

तहसीलदार संतोष काकडे यांच्या निवडीमुळे चिखली तालुख्याचे नाव उज्वल झाले असून

लवकरच त्यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गौरविण्यात येणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/amravati-bhumi-records-deputy-superintendent-yana-lach-ghetana-stuck/