महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र पासून तर मराठवाडा,
पश्चिम, मध्य आणि पूर्व विदर्भात व त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची बराच काळ
आता उघडीप राहणार असून काही ठिकाणी हलकासा पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
Related News
त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील काही
भागात सतत पाऊस झाला असून या भागात या आठवड्यात बराच काळ उघडीप राहणार आहे.
तर काही ठिकाणी मात्र अल्पसा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमका आता मुसळधार पाऊस केव्हा सुरू होईल?
तर याबाबत हवामान विभागाने सांगितले आहे की ज्या ठिकाणी अपेक्षित पाऊस झालेला नाही त्या भागात जुलै महिन्याच्या
शेवटी व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान
अभ्यासक पंजाबराव डख त्यांनी देखील हवामान अंदाज वर्तवला असून तो देखील शेतकऱ्यांसाठी तितकाच फायद्याचा आहे.
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार धुळे, नंदुरबार या भागामध्ये येणारे दोन दिवस तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे.
परंतु हा पाऊस हलक्या स्वरूपाचा राहणार असून तो सर्वदूर पडणार नाही असे देखील त्यांनी म्हटले.
त्यासोबतच लातूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, जालना तसेच परभणी,
छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्हा या ठिकाणी १३ जुलै ते १५ जुलै दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे.
परंतु या कालावधीत होणारा पाऊस देखील सर्वदूर पडणार नाही. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर,
भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये येणारे दोन ते तीन दिवस चांगला पाऊस पडणार आहे.
परंतु राज्यामध्ये सर्वदूर तरी सध्या पाऊस होणार नसल्याचे त्यांनी खास करून स्पष्ट केले.
ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी अर्धा ते एक तास इतकाच पडेल व तो देखील सर्व दूर पडणार नाही व हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील असे त्यांनी सांगितले.
तसेच शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की चार-पाच दिवस हातात असल्यामुळे शेतीची जी काही कामे राहिलेली असतील ते करून घेणे खूप गरजेचे आहे.
कारण नंतर हवामानात बदल होऊन आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक या भागामध्ये अद्याप पर्यंत चांगला
पाऊस झालेला नसल्यामुळे आता त्या ठिकाणी पाऊस सक्रिय होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
या भागात १७ तारखे नंतर पाऊस सक्रिय होईल व त्यानंतर १८ जुलै ते २० जुलै दरम्यान राज्यातील ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्या भागात पाऊस पडेल.
यामध्ये महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर,
आष्टी तसेच पाटोदा या भागामध्ये १८ जुलै नंतर दक्षिणेकडचा पाऊस सक्रिय झाल्यामुळे जोरदार पाऊस हजेरी लावेल असे त्यांनी म्हटले.
यावरून आपल्याला दिसून येते की तूर्तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करायला नक्कीच वेळ मिळेल हे मात्र निश्चित.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajamadhyaye-aaye-musadhar-paus-kevha-aani-konatya-jilaya/