अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद

अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद

आज 12 जुलै 2025 रोजी अकोला जिल्ह्यात एक विस्मयकारक नैसर्गिक घटना पाहायला मिळाली.

दुपारी 12 ते 12:15 दरम्यान आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्यसारखे वलय,

म्हणजेच सूर्य प्रभामंडल (Sun Halo) दिसून आले. या दृश्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांना थक्क करून सोडलं.

Related News

अनेकांनी आकाशाकडे नजर लावून हा अद्भुत देखावा अनुभवला आणि मोबाईलमध्ये कैद केलं.

काही युवकांनी उत्साहात “एलियन आल्याचे चिन्ह आहे का?”, “पीके परत आला का?” अशा गंमतीशीर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.

 सूर्य प्रभामंडल म्हणजे काय?

ही एक ऑप्टिकल घटना असून, सूर्याच्या किरणांचा अवकाशातील बर्फाच्या स्फटिकांवर अपवर्तन व परावर्तन झाल्यामुळे

सूर्याभोवती 22 अंश अंतरावर रंगीबेरंगी वलय तयार होतं. ही घटना सामान्यतः सिरस ढगांमध्ये आढळणाऱ्या बर्फाच्या स्फटिकांमुळे घडते.

 इंद्रधनुष्य आणि सूर्य प्रभामंडल यामधील फरक:

  • इंद्रधनुष्य हे पावसाच्या थेंबांमुळे तयार होतं आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला दिसतं.

  • तर सूर्य प्रभामंडल हे बर्फाच्या स्फटिकांमुळे तयार होतं आणि सूर्याच्या भोवतीच दिसतं.

हवामानातील बदल आणि वातावरणातील घटक कसे अद्भुत दृश्य तयार करू शकतात, याचे आज अकोल्यातील नागरिक साक्षीदार ठरले.

Related News