गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू

गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू

गुरुग्राममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत प्रसिद्ध टेनिसपटू राधिका यादव हिचा मृत्यू तिच्याच वडिलांनी

गोळी झाडून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तिच्या राहत्या घरी घडली असून राधिका स्वयंपाकघरात असताना वडिलांनी तिला तीन गोळ्या झाडल्या.

आरोपी वडिलांनी नंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली.

Related News

त्यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या “मुलीच्या पैशावर जगतोस” अशा सततच्या टोमण्यांमुळे त्यांनी

राधिकेला वारंवार अ‍ॅकॅडमी बंद करण्यास सांगितले होते. ती ऐकत नव्हती, म्हणून रागाच्या भरात गोळी झाडली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मानसिक आरोग्य,

पितृसत्ताक मानसिकता आणि संवादाचा अभाव या मुद्द्यांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

खेळ क्षेत्रातील मान्यवरांनी राधिकाच्या निधनावर शोक व्यक्त केला असून,

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/barsheetakitil-sadesat-kotinch-rasta-don-mahinayat-ukhadla/

Related News