अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो शिवभक्तांची यात्रा दरवर्षी आयोजित होते.
Related News
अकोट नगरपालिकेतील 9 कामं अपूर्ण, तरी बिले मंजूर – प्रशासनात संताप
शेतकरी आता हरभऱ्याच्या पेरणीत व्यस्त खरीप हंगाम ‘घाट्याचा सौदा’, पण रब्बीमध्ये नफ्याची आशा
फराह खान डायना पेंटीच्या बंगल्याने भारावली मुंबईच्या मध्यभागी 100 वर्ष जुने स्वर्गीय घर!
बसीर अलीचा सलमान खानवर गंभीर आरोप, शोच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह Bigg Boss 19 : धक्कादायक खुलासा!
केस गळणे आणि कोंडा संपवण्यासाठी हा एकच नैसर्गिक उपाय – 7 दिवसांत दिसेल फरक!
शिल्पा शेट्टीचा बास्टियन : 1.5 लाखांची वाइन आणि 920 रुपयांची चहा पाहून ग्राहकही चकित!
Tata Trusts संकटात! 3 प्रमुख विश्वस्तांनी मेहली मिस्त्रींना हटवले, समूहात निर्माण झाली अस्थिरता
Sensex Today LIVE: बाजारात अस्थिरता! Sensex 300 अंकांनी खाली, Nifty 25,950 जवळ — IT आणि Realty क्षेत्रात दबाव
सतीश शाहची अंतिम आठवण: 10 वर्षांच्या आठवणींचा प्रवास आणि एका गाण्याने भारावलेले हृदय
एका दशकात 80% घट! Naxalism संपतोय का?
‘पूजा’ ते मृत्यू : 8 थरकाप उडवणारे पुरावे समोर – सातारा प्रकरण हादरले
Amazon चा धक्कादायक निर्णय : तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना सोडवणार कंपनी!
यंदाही 28 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, यात्रेपूर्वी गांधीग्राम घाट परिसरातील सुरक्षा व व्यवस्थापनाचा
आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सकाळी 10 वाजता भेट दिली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी,
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग,
ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान घाटावर बॅरिकेडिंग, रस्त्यांची स्वच्छता, पथदिवे, वाहतुकीची सोय,
जलस्तराची स्थिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शिवभक्तांना
कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
