WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप

WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप

वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक

युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.

विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्याने पैसे परत मागणाऱ्या या युवक युवतींना

Related News

शिंदे गटाच्या एका माजी आमदाराच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांसह कुटुंबीयांनी केलाय..

अकोला आणि परिसरातील सुमारे 25 बेरोजगार मुलां-मुलींना ‘वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड’ अर्थातच ‘WCL’ मध्ये नोकरी लावून देतो,

म्हणून प्रत्येकी 10 लाख रुपयांनी अकोला आणि नागपूरसह 4 जणांनी फसवणूक केलीय.

अशाप्रकारे कोट्यावधी रुपयांनी नोकरीचं आमिष दाखवून गंडवलंय.. या नोकरीसाठी प्रत्येकी 20 लाखांमध्ये व्यवहार ठरवण्यात आला होता,

यातील प्रत्येकाकडून दहा-दहा लाख रुपये वसूल करत अडीच कोटी रूपये लुबाडले.

यासाठी नागपुरातील वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील आशुतोष चंगोईवाला यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांकडून हे पैसे घेण्यात आले.

विशेष म्हणजे, नागपुरात नेत या विद्यार्थ्यांना नकली अधिकाऱ्याची भेट घालून देण्यात आली असल्याच फसवणूक झालेल्याचं म्हणणं आहेय.

सुमारे आता आठ महिने उलटूनही नोकरी न मिळाल्यानंतर पैसे परत मागणाऱ्या लोकांना यातील मध्यस्थ आशुतोष चंगोईवाला हा शिंदे गटाचे उपनेते

आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांसह कुटुंबीयांनी केला आहेय..

सुनील

बांचावारे , फिर्यादी

मात्र गोपाकिशन बाजोरियांनी हे सर्व आरोप फेटाळलेय.. आशुतोष चंगोईवाला याला ओळखतो खरी मात्र गेल्या पाच वर्षापासून हा

आपल्या संपर्कात नसून नागपूरचा वासुदेव हालमारे याला आपण ओळखतच नसल्याचे त्यांनी म्हंटलय.

तर या दोघांनी फसवणूक केली असेल तर दोघांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिलीय..

गोपीकिशन बाजोरिया , माजी आमदार.

‘डब्ल्यूसीएल’ मध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारं एक मोठं रॅकेटच राज्यभरात पसरलं असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहेय.

पोलिसांनी याचा खोलात जाऊन तपास केल्यास आणखी मोठे मासे हाती लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेय.

Read Also :  https://ajinkyabharat.com/thakranna-dubrenna-theate-awhan-himmat-asal-bihar/

Related News