अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या विविध अनुदान योजनांची माहिती देण्यात आली.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
अभियानाच्या माध्यमातून मत्स्यसंवर्धन, तलाव उभारणी, इन्सुलेटेड वाहने, थर्मल आइस बॉक्स,
मोटारसायकल, प्रशिक्षण व जनजागृती यासारख्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या योजनेंतर्गत ९०% अनुदान व १०% लाभार्थी हिस्सा ठेवण्यात आला असून,
यातील ६०% हिस्सा केंद्र सरकारकडून व ४०% हिस्सा राज्य शासनाकडून दिला जाणार आहे.
अभियानात उपस्थित मान्यवर –
सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सौ. योगिता भाऊराव पोकळे, ग्रामसेवक मंगेश बुंदे, तलाठी सतीश दांडगे,
कृषी सहाय्यक राजनकार, रोजगार सेवक सुरेश तायडे, कोतवाल वासुदेव वानखडे, उपसरपंच संजयकुमार गवते,
तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा उद्देश –
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणे, रोजगाराच्या
नव्या संधी उपलब्ध करून देणे आणि शेतीपूरक उपजीविकेचा आधार तयार करणे.
उपस्थित ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, प्रधानमंत्री धरती आबा अभियानाच्या माध्यमातून
धोंडा आखर गावात सकारात्मक बदल घडवून आणण्याची नांदी झाली आहे.