“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!

"आपके नाम से हर शख्स…" शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!

पुणे | 

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related News

कोंढवा येथे गुजराती समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते.

त्यांनी अमित शाह यांना उद्देशून एक शेर सादर करत त्यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले:

“आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,
दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है,
आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है,
आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है…”

या शेरावर शाहांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यानंतर शिंदे यांनी “जय हिंद, जय महाराष्ट्र,

जय गुजरात” अशी घोषणा दिली. यामुळे काही क्षणातच कार्यक्रमातील वातावरण भारावून गेले

आणि त्याचवेळी हा ‘जय गुजरात’चा उल्लेख चर्चेचा विषय ठरला.

राज्याच्या राजकारणात या घोषणेचं वेगळं राजकीय अर्थ लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काही नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करत, “जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या नेत्याकडून जय गुजरात?” असा सवाल उपस्थित केला आहे.

या घटनेमुळे शिंदे यांच्या घोषणेनं पुन्हा एकदा राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया तापू लागल्या आहेत.

Read Also :  https://ajinkyabharat.com/st-pauls-academy-akot-yehetha-sharancha-foundation-day-enthusiast/

Related News